ती: कसला विचार करतोयेस?
तो: काही विशेष नाही , जाऊ दे.
ती: सांग ना? कसला विचार करतोयेस?
तो: बरं ऐक, rather कल्पना कर. आपण दोघ असंच चालत चाललोय. सकाळचं कोवळं उन पडलयं. आसपासच्या हवेत थोड़ा गारठा निर्माण झालाय. चालता चालता एक छोटी नदी लागते. नदीच्या बाजुला एक सुंदर तलाव आहे. तलावाच्या काठाशी आपण बसतो. तलावाचे पाणी किंचित गरम असते. दोन्ही पाय पाण्यात टाकल्याने पायांना एक प्रकारचे उब मिळतेय. आपण फ़क्त दोघच बेधुंद एकमेकात हरवून बसलोय. हातात हात गुंफ़लेले. तु सहजच माझ्या खांद्यावर डोकं टेकावतेस. आणि...आणि...
ती: आणि काय?
तो: काही नाही, जाऊ देत.
ती: नाही सांग.
तो: नको तु मारशील.
ती: नाही मारणार, सांग ना आणि काय?
तो: आणि बाजुला एक कुत्रा पाय वर करून शुऽऽ करत असतो. आणि त्याचा परिणाम म्हणुन की काय तलावातुन छोटे छोटे मशरूम उगवायाला लागतात.
ती: शीऽऽऽई. कसला बोरर आहेस तु. सगळ्या रोमांटिक वातावरणावर पाणी फिरवलेस.
तो: पाणी नाही, मशरूम फिरवले.
आणि अश्या रितीने मराठी भाषेला अजुन एक वाक्प्रचार मिळाला. 'मशरूम फिरवणे ': विरजन घालणे, बट्ट्याबोळ करणे. खरं तर आपल्या डेली कोन्वेर्सशन मधुन आपल्या न कळत अनेक म्हणी किंवा वाक्प्रचार तयार होत असतात. माझा एक मित्र 'चेपणे ' हा शब्द त्याचा मुळ अर्थ सोडुन अनेक वेग-वेगळ्या अर्थांनी वापरतो. 'पुस्तक चेपणे ' म्हणजे वाचणे, 'चेपायला कलटी' म्हणजे जेवायला गेलोय. तसेच 'चावणे ' म्हणजे खुप पकवणे किंवा खुप बोर करणे असेही बरेच लोक वापरतात. झी मराठीवरील सा रे ग म प ह्या गाण्यांच्या कार्यक्रमात अवधुत गुप्तेने एक नविनच शब्द शोधलाय. 'चाबुक गायलास ' म्हणजे खुप छान गायलास. अशी नव-नविन शब्दांची, वाक्प्रचारांची भर झाल्याने कदाचित भाषेचे evolution होत असेल.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home